नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याने एफआयआर  व खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी न्या. महेश सोनक व पुष्पा गनेडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणावर दीर्घ सुनावणीची गरज असून दिवाळीच्या सुट्यानंतर पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय झाला.  शिवकुमारच्यावतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी काम पाहिले. वरिष्ठांच्या दबावामुळे दीपाली चव्हाण हिने २५ मार्च २०२१ला आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने शिवकु मारकडून होणाऱ्या छळाविषयी व्याघ्रपकल्पाचे तत्कालीन क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे तक्रार करुरूनही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप के ला होता. त्यावरून अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी २६ मार्च २०२१ ला शिवकुमार विरोधात एफआयआर नोंदवला होता.