shivsainik banner of karnatak tourism department was torn in nagpur airport ssa 97 | Loksatta

‘चला कर्नाटक पाहू’ नागपूर विमानस्थळाबाहेरील बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले; ठाकरे गट आक्रमक

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हे बॅनर लावण्यात आल्याने चर्चेला उधाण

‘चला कर्नाटक पाहू’ नागपूर विमानस्थळाबाहेरील बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले; ठाकरे गट आक्रमक
कर्नाटक सरकारचे बॅनर शिवसैनिकांनी फाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. मात्र, नागूपर विमानस्थळावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी कर्नाटकमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे बॅनर झळकले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही गावे कर्नाटकात येण्याची हालचाल सुरु झाल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात वादंग सुरु असतानाच नागपूर विमानतळावर ‘चला कर्नाटक पाहू’ असे बॅनर लावण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंदी सिंह यांचे फोटो होते.

हेही वाचा : “पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

“अखंड महाराष्ट्राची आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपुरात येणार होते. मात्र, कर्नाटक सरकारकडून पर्यटनाचे बॅनर लावले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना डिवचण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले. मात्र, महाराष्ट्र अपमान सहन करणार नसल्याने हे आंदोलन करत बॅनर काढले गेले. २४ तासांत नागपुरातील हे बॅनर प्रशासनाने हटवावे,” असा इशारा शिवसेनेचे ( ठाकरे गट ) शहराध्यक्ष नितीन तिवारी यांनी दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 17:16 IST
Next Story
शिवसेना प्रमुखांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?