अमरावती : अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ नजीक भरधाव शिवशाही एसटी बस रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटून झालेल्‍या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला, तर २८ जण जखमी झाले. रविवारी सकाळी ९.३० वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला. रस्‍ता ओलांडणाऱ्या गायीला वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाहनावरील नियत्रण सुटल्‍याने बस उलटल्‍याचे बसचालकाने सांगितले. जखमी प्रवाशांवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

एमएच ०९ / ईएम १७७८ क्रमाकांची शिवशाही बस ही नागपूरहून अकोलाकडे जात होती. नांदगावपेठ नजीक अचानकपणे गाय रस्‍त्‍यावर आली. गायीला वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची गायीला धडक बसली. त्‍यानंतर बस रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्‍यू झाला.

vasai accident
वसई: महामार्गावरील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे सदोष काम, तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Mumbai pune expressway traffic jam
मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
Attack on passengers at Nagpur railway station Two killed and two injured
माथेफिरूचे भयंकर कृत्य… नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी
bus fire old Pune-Mumbai highway, bus caught fire,
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले
old pune mumbai highway accident
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर
Mumbai Rain Update
Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी!
Iron barrier Dombivli railway station,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद

हेही वाचा…नागपूर : आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप

बसमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते. या अपघातात जखमी झालेल्‍या २८ जणांना येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. या अपघातात बसच्‍या काचा संपूर्णपणे फुटल्‍या. परिसरातील नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांचे पथक घटनास्‍थळी पोहचले. आपातकालीन दरवाजातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्‍यात आले. या अपघातामुळे राष्‍ट्रीय महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ ठप्‍प पडली होती.

महामार्गावरील मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी बसणाऱ्या, अचानकपणे रस्‍त्‍यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यावर उपाययोजना करण्‍याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा…कारण राजकारण : नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप उमेदवाराच्या शोधात

जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा-सात महिन्यांतील संख्या भयावह आहे. गेल्या सहा महिन्यांत १४६ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत १६६ जणांचा मृत्यू झाला.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ग्रामीण भागात एकूण २८५ अपघात झाले आहेत. त्यात १४६ प्राणांतिक, ७१ गंभीर तर ५६ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. ७१ गंभीर अपघातांमध्ये १३४ जणांनी हात, पाय व अन्य अवयव कायमचे गमावले. किरकोळ अपघातांमध्ये ११४ जण जखमी झाले.

हेही वाचा…बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

या एकूण अपघातांपैकी ६६ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर, १३१ अपघात हे राज्य महामार्गांवर तर ८८ अपघात अन्य मार्गांवर झाले आहेत. सर्वाधिक अपघात राज्य महामार्गांवर झाल्याने नव्याने अपघातप्रवण स्थळे निश्चित केली जात आहेत.