scorecardresearch

Premium

नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

शेती उत्पादकतेत होणारी सतत घट, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे कमी भाव या पार्श्वभूमीवर समुद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथील शोभाताई गायधने या मागील २१ वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत आहे.

Shobhatai Gaidhane natural farming
नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : शेती उत्पादकतेत होणारी सतत घट, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे कमी भाव या पार्श्वभूमीवर समुद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथील शोभाताई गायधने या मागील २१ वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत आहे. त्यांच्याकडे १५ एकर शेती असून यामध्ये त्या हळद, गहू, तूर, चना, लिंबू, शेवगा व भाजीपाला आदी पीके घेतात. यातून त्यांना वार्षिक ८ लाख रुपयांचा नफा होवू लागला.

हेही वाचा – नागपूर : पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी घर सोडले, वाठोड्यातील पंतप्रधान घरकूल योजनेचे वास्तव

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेवून शेतामध्ये ५० मीटरचे शेततळे तयार केले. यामुळे २४ तास पाणी उपलब्ध झाले. रासायनिक खते आणि किटकनाशकाचा वापर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ लागला. हळदीचे गुणधर्म ग्राहकांना पटवून देण्यासाठी शोभाताई आपल्या शेतामध्ये हळदीचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना हळद उपलब्ध करून देतात. त्यांनी हळदीचे बेणे, कच्ची हळद, कांडी पावडर विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्यांच्या नैसर्गिक शेतीची शासनाने दखल घेवून २०२२ साली त्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 09:56 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×