scorecardresearch

बुलढाणा: धक्कादायक! हळद लागताच अल्पवयीन मुलीने प्रियकरासह ‘फिनाईल’ प्राशन केले अन्…

शहर पोलिसांनी दोघा प्रेमाविराना दवाखान्यात दाखल केले अन आईवडिलांविरुद्ध बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल केला.

lovers
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

बुलढाणा: मुलीच्या प्रेमाची कुणकुण लागताच आई वडिलांनी १६ वर्षीय मुलीचे तडकाफडकी लग्न ठरवले.  हळद लागताच तिने  ‘त्याच्या’ सह फिनाईल प्राशन करीत थेट पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिसांनी दोघा प्रेमाविराना दवाखान्यात दाखल केले अन आईवडिलांविरुद्ध बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल केला.

खामगावातील या  घटनेने सामान्यजनच काय पोलिसही सुद्धा चक्रावून गेले. सोळा वर्षीय मुलीचे परिसरातील १८ वर्षीय मुलासोबत प्रेम जुळले. याची कुणकुण लागताच पालकांनी तडकाफडकी दूरवरच्या रत्नागिरी येथील युवकासोबत लग्न ठरविले. तारीख ठरली, लग्नपत्रिका वाटल्या, नातेवाईक जमले. महिला दिनाच्या मुहूर्तावर हळद लागली.

हेही वाचा >>> बुलढाणा : बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी आणखी एकास अटक, आरोपींची संख्या आठवर

यानंतर मात्र उपवर मुलीने ‘त्याच्या’  सह फिनाईल घेतले.   अश्या अवस्थेत दोघांनी पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. पोलिसांनी या दोघांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. यानंतर आईवडिलाविरुद्ध बालविवाह  प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल केला. आता पुढील तपासात आणखी काय धक्कादायक बाबी उघड होतात याकडे शहरवासीयांचे  लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 09:39 IST
ताज्या बातम्या