scorecardresearch

आंदोलनासाठी गेला अन् बेपत्ता झाला! गडचिरोलीतील व्यक्तीसोबत दिल्लीत नेमके काय घडले?

तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नेतृत्वाखाली १९ मार्च रोजी दिल्ली येथे जिल्ह्यातून १२ दुकानदार गेले होते.

missing
आंदोलनासाठी गेलेला दुकानदार झाला बेपत्ता

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या आंदोलनाला गेलेला कोरची येथील एक दुकानदार बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. संताराम पोरेटी (४८ रा. गाहाणेगाटा) असे बेपत्ता झालेल्या दुकानदाराचे नाव असून दिल्ली पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> प्रकल्पग्रस्तांना १५ टक्के आरक्षण द्या; शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नेतृत्वाखाली १९ मार्च रोजी दिल्ली येथे जिल्ह्यातून १२ दुकानदार गेले होते. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २२ मार्चला आंदोलन होते. मात्र, तत्पूर्वी २१ मार्चला कोराची येथील संताराम पोरेटी हे बेपत्ता झाले. त्यांच्यासोबत गेलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेक ठिकाणी शोध घेतला पण ते कुठेच आढळून आले नाही. अखेर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. सात दिवसानंतरही संताराम पोरेटी यांचा पत्ता लागला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 21:06 IST

संबंधित बातम्या