scorecardresearch

Premium

एमपीएससी परीक्षा: गडचिरोलीचा शुभम राज्यात पहिला, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती

: जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते.

mpsc ranker shubham komrewar
एमपीएससी परीक्षा: गडचिरोलीचा शुभम राज्यात पहिला, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती

नागपूर : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी गावातील शुभम येलेश्वर कोमरेवार (वय २६) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.शुभम येलेश्वर कोमरेवार याने साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदासाठी शुभमने परीक्षा दिली होती. त्यात तो पात्र ठरला. त्यानंतर, तो १ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीला समोर गेला. परीक्षेत २०० पैकी ११६ गुण आणि मुलाखतीमध्ये ५० पैकी ३५ असे एकूण १५१ गुण मिळवून तो राज्यात प्रथम आला.

शुभमचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर आई पदवीधर शिक्षिका आहे. वडील धानोरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना शुभमचे प्राथमिक शिक्षण त्याच तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईरूपटोला येथे झाले. त्यानंतर ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयात पूर्ण केले. घरची परिस्थिती चांगली असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने नागपूर गाठले. मत्स्य व पशुधन विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी मत्स्य विज्ञान शाखेत डिस्टिंक्शन प्राप्त करत पदवी मिळविली. त्यानंतर मास्टर करण्यासाठी भारतातून ३३वा क्रमांक पटकावून तो सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई येथे दाखल झाला.

Legislative Building
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा; राज्यव्यवस्था
eknath shinde
“नांदेड अन् घाटी रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती, दोषींवर…”, मुख्यमंत्र्यांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश
Mumbai Monsoon Latest Update
Weather Update: हवामान विभागाकडून आज, उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट
OBC Officers Employees Association
आरक्षणाचा तिढा : ‘‘ओबीसीमधून कुणालाच आरक्षण देऊ नये, मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्या”, ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाची भूमिका

हेही वाचा >>>अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

शिक्षण सुरू असतानाच २०१९ ला सरळसेवा भरतीतून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांनी साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पदासाठी परिश्रम घेतले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shubham yeleswar komrewar of aheri village in gadchiroli district of maharashtra passed the maharashtra public service commission examination dag 87 amy

First published on: 22-09-2023 at 18:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×