नागपूर: हिंगणा मार्गावर केवळ ३ किमी रस्त्याच्या बांधकामाला महिने उलटल्यानंतर सुद्धा गती येत नसून एका बाजूला झालेल्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याने व्यापारी  व नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई व हेळसांडपणाची तक्रार डिंगडोह येथील नागरिकांनी आमदार समीर मेघे यांच्याकडे केली.           

हेही वाचा >>> पुढचे पाच दिवस आणखी थंडीचे; काय सांगतो हवामान खात्याचा इशारा?

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

मागील सहा महिन्यांपासून हिंगणा नाका ते सीआरपीएफ गेट या तीन किमी अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र आजवर एकाच बाजूने काम झाले असून ते सुद्धा अर्धवट आहे .रस्त्याची उंची वाढल्याने त्यापासून वस्त्यांमध्ये जाणाऱ्या जोडरस्त्या ना व्यवसथीत जोडण्यात आलेले नाही. रस्त्याच्या काठाला सलग फूटभर खड्डा आहे तो भरण्यात आलेला नाही.रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याचे काम अपूर्ण आहे .यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक व्यापारी दुकानांचे नुकसान होत आहे त्यांना मुख्य रस्त्यावर वाहने ठेवावी लागत आहे.याकडे कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. येथील व्यापारी व नागरिकांनी आमदार समीर मेघे यांना या मार्गावर बोलावून सुरु असलेल्या कामाचा प्रत्यक्षात दर्जा दाखवला. आमदार मेघे यांनी याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.