scorecardresearch

Premium

बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या निवासस्थानातून ‘त्या’ला केले जेरबंद, धावा केल्यावर “श्रीराम”ने केले भयमुक्त; नेमका काय आहे प्रकार?

माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरी साप आढळला. त्याला सर्पमित्राने जेरबंद केले.

snake residence Rajendra Shingne
बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या निवासस्थानातून 'त्या'ला केले जेरबंद, धावा केल्यावर “श्रीराम”ने केले भयमुक्त; नेमका काय आहे प्रकार? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : माजी मंत्री तथा सिंदखेडराजा आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या येथील निवासस्थानी ‘त्याने’ अचानक ‘प्रगट’ होऊन सर्वांची घाबरगुंडी उडवून दिली. मग उपस्थितांनी ‘श्रीराम’चा धावा केल्यावर सर्वजण भयमुक्त झाले.

हेही वाचा – नागपूर : नितीन गडकरींच्या कार्यकर्तृत्वावर ‘पीएचडी’; प्रा. मारोती कंधारे लवकरच प्रबंध सादर करणार

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

शीर्षक वाचून गोंधळून जाण्याचे काम नाही. कारण माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरी जेरबंद करण्यात आलेला कोणी गुंड वगैरे नसून तो अतिविषारी असलेला मण्यार जातीचा साप होता. या चपळ सापाला शिताफीने पकडणारे सर्पमित्र म्हणजे श्रीराम रसाळ होय. सरसर वेगाने जाणाऱ्या या सापावर नजर पडल्यावर उपस्थितांची तारांबळ उडाली. मनीष बोरकर व गणेश सनासे यांनी माहिती देताच रसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून मण्यारला ‘बरणी बंद’ केले. त्याला नंतर जंगलात सोडून देण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×