नागपूर : चंद्रपूरसह राज्यात राबवलेल्या विविध विकास कार्यातून सामान्य, गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा करून दिल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘द सीएसआर जर्नल’तर्फे समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आ. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द सीएसआर जर्नल’चे अमित उपाध्याय, जगजितसिंह कोहली, योगेश शहा, दिलीपसिंह मेहता, राकेश मिश्रा, पवन सहगल, अनुराधा देवनानी आदी यावेळी उपस्थित होते. कोणताही पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारीत वाढ होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणापेक्षा समाजकारण अधिक करतात. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा मिळते. सीएसआरच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात विकास कामांचा वेग वाढवता आला. सीएसआर म्हणजे उद्योग-व्यवसाय क्षेत्रांकडून सामान्यांसाठी पुढे येणारा मदतीचा हात आहे. सीएसआर निधीतून लोकांना अशी मदत करणारे हात म्हणजे संस्कृतीचे रक्षक आहेत.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकारणात सक्रिय असताना अगरबत्तीबद्दल सहज एक वक्तव्य केले होते. हे आपण पूर्णपणे ध्यानात ठेवले. त्यातूनच चंद्रपुरात अगरबत्ती उद्योग उभारण्याचे काम हाती घेतले. चंद्रपुरात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी रतन टाटा यांची मोलाची मदत झाली. सीएसआर निधीतूनच हे शक्य झाले, असे आ. मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.