scorecardresearch

वाशीम : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दारूच्या नशेत जावयाची मारहाण, सासूचा मृत्यू

पत्नी आणि सासूला जावयाने दारूच्या नशेत लोखंडी फावड्याने जबर मारहाण केल्याची घटना २३ मार्च रोजी शहरातील बिलाल नगर येथे घडली.

son in law beat mother in law Washim
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दारूच्या नशेत जावयाची मारहाण, सासूचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

वाशीम : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि सासूला जावयाने दारूच्या नशेत लोखंडी फावड्याने जबर मारहाण केल्याची घटना २३ मार्च रोजी शहरातील बिलाल नगर येथे घडली. यामध्ये सासूचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्यामुळे तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेख समीर शेख चाँद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अब्दुल हफिज अब्दुल सलाम हा त्याची पत्नी सबा परवीन आणि आपल्या दोन मुलांसह बिलाल नगर येथे राहत होता. अब्दुल हा नेहमी पत्नीवर संशय घेऊन मारहाण करायचा. २३ फेब्रुवारी रोजी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याने पत्नीवर संशय घेऊन पत्नी सबा परवीन व सासू रुबिनाबी शेख चाँद यांना लोखंडी फावड्याने मारहाण केली. यामध्ये सासूच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रुबिणाबी शेख चाँद ३९ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सबा परवीन ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला उपचारासाठी संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – स्रोत प्रदूषित झाल्याने शुद्ध जल मिळणे कठीण, काय म्हणतात जलतज्ज्ञ?

हेही वाचा – बुलढाणा : टिप्परची एसटी बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी

आरोपीनेदेखील विष प्राशन केल्याने त्याला अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीत दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:55 IST

संबंधित बातम्या