Premium

गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच

गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गतच्या श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील रहिवासी महिलेचा तिच्याच मुलाने खून केला.

Son murder mother in Gondia
गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गतच्या श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील रहिवासी महिलेचा तिच्याच मुलाने खून केला. कुणीतरी अज्ञाताने आईचा खून केला आणि आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलीस चौकशीत त्याचे बिंग फुटले. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संध्या महेन्द्र कोरे (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा करण महेन्द्र कोरे (२४) याच्यासोबत काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि मुलाने रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून आईचा खून केला. त्यानंतर कुणी अज्ञाताने घरात शिरून आईचा खून केला व आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव त्याने रचला.

हेही वाचा – मुंबई एटीएसकडून अकोला दंगल प्रकरणात गोपनीय चौकशी; शासनाला अहवाल सादर करणार

मुलाला जखमी अवस्थेत गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज, गुरुवारी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी घटनेसंदर्भात त्याची विचारपूस केली. चौकशीत त्याचे बिंग फुटले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 14:40 IST
Next Story
मुंबई ATS कडून अकोला दंगल प्रकरणात गोपनीय चौकशी; शासनाला अहवाल सादर करणार