scorecardresearch

संचलनात ‘मोनिका ओ माय डार्लिग’ गाण्याची धून वाजवण्याचा निर्णय दुर्दैवी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘अबाईड विथ मी’ या आवडत्या प्रार्थनेचे सूर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमातून काढून टाकणे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मोनिका.. ओ माय डार्लिग या गाण्याची धून वाजवण्याचा मोदी सरकारच्या निर्णय दुर्दैवी आहे.

हा तर पंरपरा मोडण्याचा प्रयत्न; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांची मोदी सरकारवर टीका

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘अबाईड विथ मी’ या आवडत्या प्रार्थनेचे सूर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमातून काढून टाकणे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मोनिका.. ओ माय डार्लिग या गाण्याची धून वाजवण्याचा मोदी सरकारच्या निर्णय दुर्दैवी आहे. महागाई, बेरोजगारी वाढवून लोकांचे जीवन असह्य केल्यानंतर देशाच्या प्रथा, पंरपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारद्वारे होत आहे. याबाबत जनता सरकारला नक्कीच जाब विचारणार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. जोशी नागपूर दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी काँग्रेसचे सरचिणीस संदेश सिंगलकर सोबत होते. काँग्रेसचा पक्ष विस्तार, संघटना बांधणी, डिजिटल सदस्यता नोंदणी यासोबत आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या तयारीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

ते म्हणाले, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून मुठभर लोकांच्या हाती संपत्ती दिली जात आहे. रोजगाराच्या संधी नसल्याने युवकांची कुंचबणा होत आहे. मोदी सरकारचे जे काही चालले आहे. त्यामुळे लोक पर्याय शोधत आहेत. तो पर्याय म्हणजे काँग्रेस आहे. भविष्यात देशात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष राहणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने पक्षविस्तार आणि जनसंपर्क दोन सूत्री कार्यक्रमाची आखणी केली आहे.  पक्ष बळकट करून लोकांचे प्रश्नांना आवाज द्यायचा, त्यांना मदत करायची असे धोरण आहे. त्यानुसार डिजीटल सदस्या नोंदणी प्रारंभ झाला आहे. ३१ मार्च पर्यंत सदस्यता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

महापालिका, जिल्हा परिषद स्वबळावर

विदर्भ काँग्रेससोबत कायम राहिला आहे. अलीकडच्या निवडणुकातही विदर्भात काँग्रेस क्रमांक एकवर आहे. लोक काँग्रेसला भरभरून समर्थन देत आहे. आम्हीच ते घेण्यात कमी पडत आहोत. आता आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व निवडणुका काँग्रेस स्बळावर लढणार आहोत, असेही मोहन जोशी म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Song monica o my darling movement unfortunate ysh

ताज्या बातम्या