नागपूर : अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेप्रमाणे भारताची कार्यरत असलेली अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो. देशातील अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या राबवून या संस्थेने देशाचे नाव जगभर पोहोचवले आहे. अशा या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्त्रोची ‘स्पेस ऑन व्हिल्स’ बस तयार केली असून इंडियन सायन्स काँग्रेसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमांची व आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती ही या गाडीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यात चांद्रयान-१ मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोच्या एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास या गाडीमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. चांद्रयान व मंगलयान मोहीम राबवण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहिमेची माहिती तसेच ही मोहीम राबवताना आलेली आव्हाने याची माहिती देण्यात आली आहे.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Sealed by an international organization on the name Chandrayaan 3 landing site Shiva Shakti
‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

हेही वाचा >>> नागपूर : इंडियन सायन्स काँग्रेसने निवडलेली विदर्भातील प्रमुख स्थळे कोणती?, ‘या’ स्थळांचा उल्लेख तर उरलेल्यांना…

यासोबतच या गाडीत लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आला आहे. आयआरएस सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील काही शहरांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत, ती शहरे अंतराळातून कशी दिसतात हे सचित्र येथे पहायला मिळते. यात व्हॅटिकन सिटी, दोहा, दुबई, वॅाशिंग्टन या शहरांचा समावेश आहे. सर्वसामान्यांना इस्त्रो या संस्थेची माहिती व्हावी यासाठी या विज्ञान परिषदेत स्पेस ऑन व्हिल्स ठेवण्याचा उद्देश आहे. विशेषतः तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विज्ञानविषयक प्रदर्शनात ही गाडी असल्याचे इस्त्रोच्या शास्त्रज्ञ जयती विजयवर्गीय यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

विशेषतः तरुणाईचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्पेस ऑन व्हिल्सला मिळत आहे. कोलकाता येथून आलेल्या सौम्या चक्रवर्ती यांनी सांगितले की, स्पेस आन व्हिल्सच्या माध्यमातून इस्त्रोच्या संशोधन गाथा आपल्यापुढे सचित्र पहायला मिळते. इस्त्रोचे न उलगडलेले अनेक पैलू या माध्यमातून पुढे आले असल्याचे तिने सांगितले. अमरावती येथून आलेला अतुल ठाकरे म्हणाला की, स्पेस ऑन व्हिल्स हा अत्यंत चांगला माहितीपर उपक्रम आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विज्ञान चर्चासत्रे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. मात्र, यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे ती इस्त्रोची स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी. या माध्यमातून तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विज्ञानविषयक प्रदर्शनात ही गाडी असते.

– जयती विजयवर्गीय, इस्त्रोच्या शास्त्रज्ञ