scorecardresearch

विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले

दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्कटदाबी केली, असे पटोले म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले
विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून दाखले दिले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. हा अविश्वास प्रस्ताव आहे आणिआम्ही नियमानुसारच आणला आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्कटदाबी केली, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा… “खरंतर सभागृहातच आमच्यावर अत्याचार होतो…” महिला आमदार विधानसभेत स्पष्टच बोलल्या

हेही वाचा… नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांधीजींच्या मारेकऱ्याच्या नावाने कार्यालय!

विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले, हे अधिवेशन पर्यटनासारखं झालयं. या सरकारकडे मंत्री नाहीत, दोन हजार लक्षवेधी मांडल्या असं सांगितलं जातयं. पण लक्षवेधींना उत्तरं देताना मंत्री नाहीत. गेल्या दोन अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात, त्याला काही आधार नाही. राज्यपाल भवनात नियमबाह्य काम सुरू आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना मांडले. त्याचे काही उत्तर नाही. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड सरकार असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 11:07 IST

संबंधित बातम्या