Premium

अमरावती : टायर फुटल्याने भरधाव ट्रक कारला धडकला; भीषण अपघात वडील व मुलगी ठार; आई गंभीर जखमी

शहरालगत चांदुर रेल्वे मार्गावर वैष्णोदेवी मंदिरासमोर ट्रकने कारला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात‍ कारचालक मुलीसह तिच्या शेजारी बसलेले वडील जागीच ठार झाले, तर मागे बसलेली आई गंभीर जखमी झाली.

amravati accident
चांदुर रेल्वे मार्गावर वैष्णोदेवी मंदिरासमोर ट्रक आणि कारची धडक

अमरावती : शहरालगत चांदुर रेल्वे मार्गावर वैष्णोदेवी मंदिरासमोर ट्रकने कारला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात‍ कारचालक मुलीसह तिच्या शेजारी बसलेले वडील जागीच ठार झाले, तर मागे बसलेली आई गंभीर जखमी झाली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला.
साहेबराव खरबडे आणि रेणू खडबडे (रा. शेगाव नाका, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहेबराव खरबडे हे पत्नी विजया आणि मुलगी रेणू यांच्‍यासह वर्धा येथून अमरावतीला येत असताना शहरालगत वैष्णोदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचा समोरील टायर फुटला आणि भरधाव वेगात असणारा हा ट्रक कारवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरच्या भागाचा संपूर्ण चुराडा झाला. रेणू खरबडे या कार चालवत होत्या तर त्यांच्या शेजारी त्यांचे वडील साहेबराव खरबडे बसले होते. साहेबराव खरवडे हे घटनास्थळीच ठार झाले. तर रेणू खरबडे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या विजया खरबडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ट्रक चालक देखील गंभीर जखमी आहे.

हेही वाचा >>>अमरावती : शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरला तात्‍काळ अटक करा, राष्‍ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्‍तांना निवेदन

अपघातानंतर नागरिकांची गर्दी घटनास्थळावर उसळली. तसेच या मार्गावरील वाहतूक बराच वेळ पर्यंत खोळंबली. अपघात होताच लगतच्या हॉटेलमधील कर्मचारी धावून आलेत आणि त्यांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढले. फ्रेझरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी घटनास्थळीवरील गर्दी पांगवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 19:32 IST
Next Story
अमरावती : शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरला तात्‍काळ अटक करा, राष्‍ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्‍तांना निवेदन