लोकसत्ता टीम

वर्धा : मंगळवारी पहाटे हा अपघात घडला. स्थानिक निर्मल बेकरी चौकात असलेल्या एका पोलवार बॅनर लावण्याचे काम सूरू होते. त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव निघालेल्या ट्रकने या ठिकाणी धडक दिली. त्यात मैदानकाल परिसरात राहणारा एकोणवीस वर्षीय सुनील बेहरा हा युवक जागीच ठार झाला आहे.

Vadgaon bus accident in Kudoshi khed
वडगाव बसला कुडोशी मध्ये अपघात; दोन विद्यार्थिनी जखमी
Mumbai, girl, hit, school bus,
मुंबई : शाळेच्या गाडीने धडक दिलेल्या मुलीचा अखेर मृत्यू
Mumbai, Murder, old mother,
मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
The motorist who crushed the constable with a speeding car was found to be under the influence of alcohol
भरधाव मोटारीने हवालदाराला चिरडणाऱ्या मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पण्ण; वाढदिवसाची पार्टी करणारे आणखी दोघे अटकेत
extortion case
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; खंडणी प्रकरण
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
The trees on both sides of the road were cut down for the ongoing development works in Mumbai
मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांसाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा बळी; जनहित याचिकेद्वारे उपस्थित मुद्द्याची उच्च न्यायालयाकडून दखल

तसेच उरदानंद बेहरा व राजेश बेहरा हे दोघे गंभीर जखमी झालेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हे तिघेही ओडिसा राज्यातील रहिवासी असून ते कंत्राटी पद्धतीने कामावर आले होते.

आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 भंडाऱ्यात मतमोजणीसाठी कायमस्वरुपी व्यवस्था-दीड महिन्यात बांधले सभागृह

७ जून पासून वर्ध्यात जादूगर शो होत आहे. त्याची ठिकठिकाणी प्रसिद्धी केल्या जात आहे. त्यासाठी हे मजूर आले होते. ते तिघेही मोटर सायकल (क्र. ओ आर ०४ एटी ७२५७) यावर उभे होत निर्मल बेकरी चौकात बॅनर लावण्याचे काम करीत होते. त्यांना (यू पी. ७५ ए टी ०२०३) या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली.

अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वर्धा शहर पोलीसांनी अपघातस्थळी भेट देत विचारपूस सूरू केली. आज पहाटे चार वाजता हा अपघात घडला आहे. जखमी युवकांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.