Premium

अमरावती : लग्‍नसराई ‘एसटी’ ला पावली! १७ कोटींचे भरघोस उत्‍पन्‍न

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने १ ते ३१ मे कालावधीत सुमारे १७ कोटी रुपयांचे भरघोस उत्‍पन्‍न मिळवले आहे. 

amravati bus stop
अमरावती बसस्थानक

अमरावती : उन्हाळ्याचे दिवस.. मे महिन्यातील कडक तापमान असूनही एसटी महामंडळाला या महिन्यातील लग्नसराई व सुटी चांगलीच पावली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने १ ते ३१ मे कालावधीत सुमारे १७ कोटी रुपयांचे भरघोस उत्‍पन्‍न मिळवले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाची उन्हाळी सुटी व लग्नसराईचा मे महिना हा गर्दीचा राहिला. यासाठी विभागाने सुमारे ३३० बस द्वारे फेऱ्यांचे विविध मार्गावर नियोजन केले होते. या दिवसातील वाढती गर्दी लक्षात घेता जादा बसची व्यवस्था करून दिली होती. प्रवाशांच्‍या चांगल्‍या प्रतिसादामुळे महामंडळाच्‍या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार, अपक्ष आमदार जोरगेवार यांची माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने महिनाभरात १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. उन्हाळी सुटी, लग्नसराईमुळे संपूर्ण मे महिन्यातील हंगाम गर्दीचा राहिला. महामंडळामार्फत महिलांसाठी ५० टक्के सवलतीची सन्मान योजना, ज्येष्ठनागरिक योजना, ७५वर्षावरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरु केल्याने प्रवासीसंख्या दुपटीने वाढली.

३३० बस धावल्या ३४.०३ लाख कि.मी.

१ ते ३१ मे या कालावधीत अमरावती आगारातून ५२, बडनेऱ्यामधून ४०, परतवाडा आगारातून ५४, वरूड ४०, चांदूर रेल्वे ३५, दर्यापूरमधून ४२, मोर्शीतून ३३, चांदूर बाजार ३४, अशा ३३० बस रोज सोडण्यात आल्या. एकूण १७ कोटी ८३ लाख ७२ हजार ९३ रुपये उत्पन्न आणि ३४.०३ लाख किलोमीटर या बस धावल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St amravati division corporation earning 17 crore income mma 73 ysh

Next Story
चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार, अपक्ष आमदार जोरगेवार यांची माहिती