महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ आणि मानव विकास मिशनच्या नादुरुस्त किंवा ऐन प्रवासात बिघडणाऱ्या बसगाड्या एरवी प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी वैताग आणणाऱ्या ठरतात. मात्र, अशाच बिघाडामुळे एका बसची चोरी फसली. ही मजेदार घटना देऊळगाव राजा परिसरात घडली. ही बस सहीसलामत असून आज, मंगळवारी दुपारपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा >>>नागपूर: रुक्ष कारागृहही गहिवरले, कैद्यांच्या मुलांची गळाभेट

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

शाळकरी मुलींना ग्रामीण भागातून ने-आण करण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत एमएच ०७ सी ९२७३ क्रमांकाची बस वापरली जाते. ही बस सोमवारी उत्तररात्री ३ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्थानिक बस स्थानकातून चोरून नेली. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. बस पळवून नेताना तित अचानक बिघाड आला. बसचे ‘युनिव्हर्सल जॉईंट’ तुटल्याने ती बंद पडली. चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी बस चिखली मार्गावरील एका बँकेजवळ सोडून पळ काढला. ‘करायला गेले काय, अन् झाले उलटे पाय’, अशी स्थिती या चोरट्यांची झाली.दरम्यान, बस चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार करण्यासाठी बसस्थानक कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, वरिष्ठांनी त्यांना तक्रार करण्यापासून रोखल्याची चर्चा सुरू आहे.