महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘एसटी’च्या चालक-वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत अर्धशिक्षित उमेदवारांनाही पैसे घेऊन पात्र केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यावर तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु, वाहन योग्यरित्या चालवता येत नसलेल्या व पात्र ठरवलेल्या उमेदवारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईबाबत महामंडळाकडून अद्यापही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे या मुद्यावर महामंडळ अद्यापही गोंधळलेले असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> नागपूर: भाजपच्या माजी आमदाराला मिळालेले पुरस्कार, सन्मान चिन्हे पदपथावर विक्रीला

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे झालेल्या चाचणी परीक्षेदरम्यान उपस्थित काही उमेदवारांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले, की पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना एसटी बस योग्यरित्या मागे घेता येत नसल्याचे चित्र होते. त्याच्या काही नोंदीही चौकशी समितीकडून घेण्यात आल्या. त्यानंतरही येथील योग्यरित्या वाहन चालवता न येणाऱ्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाईबाबत महामंडळाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. महामंडळाला सादर झालेल्या अहवालात पाच उमेदवारांवर आक्षेप नोंदवण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु, काहीच कारवाई झाली नाही, हे विशेष.

वाहन योग्यरित्या चालवता येत नसताना पात्र ठरलेल्या उमेदवाराबाबत कोणतीही माहिती पुढे आली नाही. त्यामुळे उमेदवारांवरील कारवाई वा फेरपरीक्षेबाबत निर्णय झाला नाही.

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St corporation confused about action against st drivers nagpur news ysh
First published on: 01-12-2022 at 11:42 IST