नागपूर : तीन हजार किलोचा चिवडा ; विश्वविक्रमाला सुरूवात | Starting the world record by making food amy 95 | Loksatta

नागपूर : तीन हजार किलोचा चिवडा ; विश्वविक्रमाला सुरूवात

जागतिक खाद्य दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या विष्णूजी की रसोई येथे सहा हजार किलो क्षमतेच्या कढईत तीन हजार किलो चिवडा तयार केला जात आहे.

Starting the world record by making 3000 kg Chivada
विष्णूजी की रसोई येथे सहा हजार किलो क्षमतेच्या कढईत तीन हजार किलो चिवडा तयार केला जात आहे

जागतिक खाद्य दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या विष्णूजी की रसोई येथे सहा हजार किलो क्षमतेच्या कढईत तीन हजार किलो चिवडा तयार केला जात आहे. या माध्यमातून विक्रम करण्याचा विष्णू यांचा मानस आहे.विष्णू मनोहर वेगवेगळ्या उपक्रमातून पारंपरिक खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहचवत असतात. यातून काही विक्रम झाले आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : गुप्ता कोलवॉशरी बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी, पिके झाली काळी, आरोग्याच्या समस्या

यावेळी ते सहा हजार किलोच्या कढईत अडीच ते तीन हजार किलो हा चिवडा तयार करीत आहे. त्याला रविवारी सकाळी सुरूवात झाली. हा चिवडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली, मेळघाट सारख्या दुर्गम भागात आदीवासी कुटुंबापर्यंत पोहचवला जाणार आहे.हा चिवडा तयार करण्यासाठी तेल २०० किलो तेल, १०० किलो ,शेंगदाणे. काजू१०० किलो, १०० किलो किरमिजी, ५० किलो, फुटाणे,कढीपत्ता, धनिया पावडर यासह इतर साहित्य उपयोगात आणले जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-10-2022 at 15:45 IST
Next Story
Wardha : हिंदी विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या; १३ विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ