scorecardresearch

नागपूर: गोंधळ घालणाऱ्या लोकांना पाच, सात वर्ष महाराष्ट्राबाहेर ठेवा; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, कोणत्याही समाजाचे असो…

संभाजीनगर येथे गोंधळ घालणारे लोक घातक आहेत. ते कुठल्याही समाजाचे असो, अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे chadrashekhar bawankule
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

संभाजीनगर येथे गोंधळ घालणारे लोक घातक आहेत. ते कुठल्याही समाजाचे असो, अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे. अशा घटना झाल्यावर काही विरोधी गटातील राजकीय नेते राजकारण करून समाजाला भडकवण्याचे काम करतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे या घटनेवरून वादग्रस्त वक्तव्य करतात, मात्र असे वक्तव्य केले आणि समाज भडकला तर त्याला तेच जबाबदार राहतील. जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा विरोधी पक्षाने शांततेचे आवाहन करून घटना संपवायच्या असतात, मात्र घटना कशी भडकेल आणि राज्यात कसे दंगे होतील यासाठी ते वादग्रस्त वक्तव्य करतात असेही बावनकुळे म्हणाले. देशात बॉम्बस्फोट घडले तेव्हा सगळ्यांनी निषेध नोंदवला होता आणि शिक्षेची मागणी केली होती, मात्र राजकारण इतके खाली गेले की काही नेते बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून त्यावर राजकारण करत आहेत. खैरे यांना काही वाटते की नाही, ते फडणवीस यांच्यावर आरोप करतात. खैरे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असे वागणे बरोबर नाही. ते त्यांचे शहर आहे, ते तिथे राहतात. फडणवीस अशा घटनांना खतपाणी घालू शकत नाहीत. अशा घटना घडवणाऱ्यांना ते सोडणार नाहीत. या घटनेचा तपास करून यामागे कोण आहेत ते फडणवीस शोधून काढतील असेही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, आमदारांची बैठक घेण्यात आली असली तरी त्यात आमदारांच्या कामाचा कुठलाही अहवाल नाही. आमदारांच्या वार्षिक बैठका होत असतात. संघटना आणि लोकप्रतिनिधींचा समन्वय हा त्याच ठिकाणी असतो, असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 17:18 IST

संबंधित बातम्या