विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार - राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय | State Cabinet decision All three Development Boards including Vidarbha will be reconstituted nagpur | Loksatta

विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारने २९ जून २०२२ रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला होता.

विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : विदर्भ विकास मंडळासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी म हाविकास आघाडीने सत्ताकाळाच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या शिंदे-भाजप सरकारने त्याला स्थगिती दिली होती. मंडळ पुनर्जीवित व्हावे,अशी मागणी विरोधी पक्षात असताना भाजपे लावून धरली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्याने टीका होत होती.

सोमवारी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता या मंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी स्थापन विदर्भ, मराठवाडा विकास मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आल्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली नव्हती. या मुद्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती.

हेही वाचा : भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

महाविकास आघाडी सरकारने २९ जून २०२२ रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला होता. पण शिंदे गट-भाजप युतीचे सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले होते. त्यात या निर्णयाचा समावेश होता. अडीच महिन्याच्या काळात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र विकास मंडळांचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर दिसला नाही. याउलट सरकारने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी पूर्वीच्या सरकारने पाठवलेली सदस्यांची यादी रद्द करण्यासाठी तत्परता दाखवली होती. अखेर सरकारने निर्णय घेतला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

संबंधित बातम्या

“अजित पवारांनी उंचीचा विचार करून बोलावं”; राज्यपालांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?
आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी वाघाच्या अवयवांची तस्करी, शिकाऱ्यांना मध्य प्रदेशातून अटक; वाघाची कातडी आणि पंजे जप्त
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे…”
राज्यभरातील तरुण-तरुणी ‘रेव्ह पार्टी’साठी नागपुरात; समाज माध्यमांवरून जाहिरात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मिर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी
हायकोर्ट नगर रचनाकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
“आमच्या नितूचा अभ्यास कच्चा” नितेश राणेंविरोधात सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी!