नागपूर : महायुती सरकारने शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला असूनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नव्हता. आचारसंहितेपूर्वी ही यावर चर्चा झाली होती, मात्र वेतन वाढ रखडलेलीच होती. अखेर महायुती सरकार सत्तेत येतात शिक्षकांसाठी त्यांनी गोड बातमी दिली आहे.

अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शिक्षकांच्या पगारवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढवली होती. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर आता शिक्षकांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर राज्यातील सुमारे ५० हजार शिक्षकांना २० टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत मागवली होती.

second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nandurbar teacher was extorted Rs 12 lakh after being trapped in pornographic film
नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
1 25 crores is proposed for purchasing educational materials to strengthen math foundation
माजी मंत्र्यांच्या हट्टामुळे महापालिकेचा सव्वा कोटी खर्चाचा घाट?
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
Salary of hourly professors at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is overdue
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!

हेही वाचा…‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…

राज्य सरकारच्या या निर्णयाचा जवळपास ५० हजार शिक्षकांना लाभ घेता येणार आहे. या निर्णयानुसार पात्र शिक्षकांना २० टक्के अनुदान वाढ मिळणार आहे. देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती १० डिसेंबरपर्यंत मागवण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तब्बल १२ वर्षांची प्रतीक्षा शिक्षकांची संपणार आहे. पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २० टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भातल्या निर्णयाचे काय होणार, याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागलेले होते. शिक्षण विभागाकडून पात्र शाळांची यादी आणि शिक्षकांची माहिती १० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत मुख्याध्यापकांना दिली होती. आता १४ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयामुळे शिक्षकांना ८० टक्के वेतन मिळणार असून साधारणपणे १ जूनपासून शिक्षकांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवला जात आहे. राज्यभरात हजारांहून अधिक शिक्षक कायम विनाअनुदानित शाळांवर विनावेतन काम करत असून २००१ पासून कायम अनुदानित तत्त्वावर शाळांना मान्यता दिली आहे. त्यानंतर २००९ ला ‘कायम’ शब्द वगळल्यानंतर २०१६ रोजी अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला होता.

Story img Loader