पोलाद कंपन्यांकडून चार राज्यांना ५३ टक्के प्राणवायू पुरवठा  

कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या तुटवडय़ामुळे केंद्र व विविध राज्य सरकारांनी पोलाद कंपन्यांकडून प्राणवायूचे उत्पादन वाढवून घेतले. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते २५ जुलै २०२१ पर्यंत देशातील विविध पोलाद कंपन्यांकडून उपलब्ध झालेल्या एकूण प्राणवायूपैकी ५३ टक्के प्राणवायू हा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा या चार राज्यांना उपलब्ध करून देण्यात आला. केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. करोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह इतर राज्यांत मार्च २०२१ नंतर सुरू झाली. सर्वाधिक रुग्ण व मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले. या काळात प्राणवायूचा तुटवडा जाणवला. त्यामुळे देशातील २८ पोलाद प्रकल्पांत वैद्यकीय प्राणवायूचे उत्पादन वाढवले गेले. १ एप्रिल २०२१ ते २५ जुलै २०२१ पर्यंत या कंपन्यांनी २८ राज्यांना तब्बल २ लाख ३० हजार २६२ टन प्राणवायूचा पुरवठा केला. सर्वाधिक १९.१६ टक्के पुरवठा कर्नाटकला, १३.१६ टक्के महाराष्ट्राला, आंध्रप्रदेशला १३.०४ टक्के व तेलंगणाला ७.४६ टक्के पुरवठा करण्यात आला.   मध्यप्रदेशला ४.९८ टक्के म्हणजे ११ हजार ४७७.१९ टन, छत्तीसगडला ३.२२ टक्के म्हणजे ७ हजार ४०४.९६ टन, झारखंडला २.६७ टन म्हणजे ६ हजार १३७.६७  टन, पश्चिम बंगालला ६.६१ टन म्हणजे १५ हजार २२४.०३ टक्के, बिहारला २.०१ टक्के म्हणजे ४ हजार ६२२.८३ टन, ओडिशाला ५.५४ टक्के म्हणजे १२ हजार ७५०.९ टन, उत्तर प्रदेशला ६.५५ टक्के म्हणजे १५ हजार ८०.२ टन, गुजरातला ३.२८ टक्के म्हणजे ७ हजार ५६३.२४ टन, तामिळनाडूला ४.६६ टक्के म्हणजे १० हजार ७२५.३३ टन, हरियाणाला ३.६६ टक्के म्हणजे ८ हजार ४१९.७०७ टन, दिल्लीला ०.९३ टक्के म्हणजे २ हजार १३६.७५ टन पुरवठा केला गेला.

सर्वाधिक प्राणवायू उत्पादन केलेले प्रकल्प

१ एप्रिल २१ ते २५ जुलै २१

प्रकल्पाचे नाव                                                                        उत्पादन टनामध्ये

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड विजयनगर वर्क्‍स                           २८,०२३.६०

टाटा स्टील जमशेदपूर (लिंडे)                                                   २१,२८५.९६१

सेल भिलाई (बीओओ प्लांट लिंडे)                                             २१,२५५.०४

सेल राउरकेला (बीओओ प्लांट लिंडे)                                        १८,८१७.३६

एएमएनएस हजीरा (आईनॉक्स)                                                ११,८६५.०९

टाटा स्टील जमशेदपूर (एसबल्यूआईपीएल)                                 ११,२५८.२६

सेल बोकारो (बीओओ प्लांट आईनॉक्स)                                      १०,८२७.९४

टाटा स्टील कलिंगनगर                                                           १०,६४१.०३

करोनाच्या कठीण काळात प्राणवायूचा तुटवडा असल्याने सरकारच्या विनंतीवरून देशातील २८ पोलाद कंपन्यांनी २ लाख ३० हजार २६२ टन प्राणवायूचे उत्पादन केल्याचे पोलाद मंत्रालयाची आकडेवारी सांगते. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्राला हजारो रुग्णांवर उपचार करण्यास मदत झाली व आजही होत आहे.’’

– डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन.

पोलाद कंपन्यांतील प्रतिवर्ष प्राणवायूचे उत्पादन

        वर्ष             उत्पादन टन

२०१८- १९        २,४९२

२०१९- २०         २,४९४

२०२०- २१         २,७४८

२०२१- २२         ४,१०२

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Steel companies supply 53 percent oxygen to four states maharashtra on second position