scorecardresearch

Premium

‘फेसबुक’वर येणारी अनोळख्या मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’, अश्लिल व्हिडीओ कॉलची मागणी करू शकते तुमचा घात; काय प्रकार आहे बघा

फेसबुकवर येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टने अनेकांना लाखोंनी लूटले आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे?

facebook
आपल्याला फेसबुकवर अनेकदा देखणा फोटो असलेल्या तरुण मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येते.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर: हल्ली फेसबुकचा वापर सर्वच करताना दिसतात. समाजमाध्यमांचा वाढता वापर हा काहींना अंगलट आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. फेसबुकवर येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टने अनेकांना लाखोंनी लूटले आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे?, यापासून आपला बचाव कसा करावा यासाठी आपण काही गोष्टींची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Noa Argamani viral video israeli student
“मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO
navi mumbai police, nigerian citizen arrested, drugs of rupees 84 lakhs 85 thousand seized, combing operation
नवी मुंबई : कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८४ लाख ८५ हजारांचा अंमली पदार्थ साठा जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक
Startup Valuation Many Other Types
Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?
Jalandhar News
पोलीस वाहनात बनवला अश्लील रील, VIDEO व्हायरल होताच अधिकाऱ्याचं निलंबन; नेमकं काय घडलं वाचा!

आपल्याला फेसबुकवर अनेकदा देखणा फोटो असलेल्या तरुण मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येते. अनोखळी असतानाही अनेकदा नवीन मित्र जोडण्याच्या मोहात ही फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याकडून स्वीकारली जाते. त्यानंतर काही वेळाने फेसबुकवरील मॅसेंजरवर संबंधित मुलीचा मॅसेज येतो. ती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागते आणि व्हिडीओ कॉलवर अश्लिल गोष्टी करण्याचे आमंत्रणही देते. अनेकजण या मोहात पडून व्हिडीओ कॉल करतात. मात्र, हा व्हिडीओ कॉल होताच तुम्ही अश्लिल व्हीडीओ पाहता असताना तुमचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले जाते.

आणखी वाचा-अमरावती विभागात आतापर्यंत पावसाचे ३१ बळी; ९ हजारावर विस्‍थापित

अनेकदा तुम्हालाही अश्लिल कृत्य करण्यासाठी बोलले जाते. त्याच्या काही वेळातच या सर्व व्हिडीओ रेकॉर्डिंग तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवून नंतर तुमच्या फेसबुकमध्ये असलेल्या जवळच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली जाते. तुम्ही तात्काळ मागतील तेवढे पैसे द्या अन्यथा तुमच्या मित्रांना हे व्हिडीओ पाठवले जातील असा संदेश पाठवला जातो. तुम्ही पैसे पाठवण्यास नकार दिल्यास काही लोकांना व्हिडीओ पाठवल्याचा स्क्रीन शॉटही तुमच्या व्हॉट्सॲपवर येतो. अशा प्रकारामध्ये आतापर्यंत अनेक लोक प्रतिष्ठेसाठी पैसे देऊन फसले आहेत. त्यामुळे अशा अनोळख्या फ्रेंड रिक्वेस्ट पासून सतर्क राहणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-रिमझिम पावसाने वाशिम जिल्हा चिंब; कुठे दमदार तर कुठे तुरळक पाऊस!

फेसबुक अकाऊंट कसे सुरक्षित करावे?

फेसबुकवरील फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, यासाठी ‘सेटिंग्स अँड प्रायव्हसी’मधील सेटिंग्समध्ये जाऊन ‘हाऊ पीपल कॅन फाइंड अँड कंट्रोल यू’मध्ये जाऊन ‘हू कॅन सी युअर फ्रेंड लिस्ट’मध्ये ‘ओन्ली मी’ करावे. तसेच, आपल्या फेसबुकवरील प्रोफाइल फोटो अथवा कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी अथवा डाऊनलोड करू नये, यासाठी ‘सेटिंग्स आणि प्रायव्हसी’मधील ‘सेटिंग्स’मध्ये ‘प्रोफाइल लॉक’वर जाऊन ‘लॉक युअर प्रोफाइल’ करावे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Strange girls friend request on facebook can be dangerous dag 87 mrj

First published on: 27-07-2023 at 14:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×