यवतमाळ : संपूर्ण राज्याच्या नजरा लागून राहिलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे ९४ हजार ४७३ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. ३० व्या अंतिम फेरीअखेर त्यांना पाच लाख ९४ हजार ८०७ इतकी मते मिळाली, तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना पाच लाख ३३४ इतकी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विजयाचे प्रमाणपत्र देत संजय देशमुख विजयी घोषित केले.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल, असे मतदानोत्तर कल चाचण्यांमधूनही सांगण्यात आले होते. ती शक्यता प्रत्यक्ष निकालातही खरी ठरली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकाची ५६ हजार ३९० मते समनक पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवाराचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे बाद झाल्यानंतर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीने पाठींबा जाहीर केला होता. त्याचा फायदा अनिल राठोड यांना झाल्याचे निकालातून दिसून येते. चौथ्या क्रमांकाची १७ हजार ३९६ मते बसपाचे उमदेवार हरिभाऊ राठोड यांनी घेतली. हरिभाऊ राठोड यांनी यापूर्वी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र यावेळी त्यांना स्वत:चे डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. याशिवाय अमोल कोमावार, उत्तम इंगोले, धर्मा ठाकूर, डॉ. अरूणकुमार राठोड, प्रा. किसन अंबुरे, गोकुल चव्हाण, दीक्षांत सवाईकर, नूर अली मेहबूब अली शहा, मनोज गेडाम, रामदास घोडाम, विनोद नंदागवळी, संगीता चव्हाण, संदीप शिंदे हे उमेदवार रिंगणात होते. ‘नोटा’स नऊ हजार ३९१ इतकी मते मिळाली. ७१ मते अवैध ठरली, १२ लाख १६ हजार १३९ मते वैध ठरली.

Loksatta karan rajkaran Shiv Sena Shinde group questions who will replace Ravindra Waikar from Jogeshwari constituency for assembly elections
कारण राजकारण: जोगेश्वरीत वायकरांच्या जागी कोण?
Wardha Political Aspirants Emerge After Lok Sabha Results Congress Leaders Seek MLA Tickets
काँग्रेसला सुगीचे दिवस…पण, दावेदारांसोबतच डोकेदुखीही वाढली…वर्धेत तर एका नेत्याने…
Hitendra Thakur, Challenge,
बालेकिल्ल्यातच पिछेहाट, विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आव्हान
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
Sangli, Congress, Sharad Pawar group,
सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासूनच कुरघोड्या सुरू
kp patil marathi news
के. पी. पाटील यांची पावले ‘मविआ’कडे ; उत्पादन शुल्क खात्याची कारवाई ‘बिद्री’ कारखान्यावर
Chief Minister eknath shinde visit to campaign in Nashik Teachers Constituency today
नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांचा दौरा
Who is the elder brother of Mahavikas Aghadi Anil Deshmukhs reply to Nana Patoles claim
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? पटोलेंच्या दाव्यावर अनिल देशमुख म्हणाले, “तकलादू…”


विजयाची खात्री होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली. उमेदवार संजय देशमुख हे महाविकास आघाडीच्या मतमोजणी केंद्रात पोहचताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा…wardha Lok Sabha Election Result 2024 वर्धा : रामदास तडस यांना ‘हॅटट्रिक’ची हुलकावणी

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय – देशमुख

हा विजय लोकांचा आहे. ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती. हा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. भविष्यात जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचे महाविकास आघाडीचे लक्ष्य राहिल, असे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख म्हणाले.