scorecardresearch

अकोला : सहलीला जाणे युवकाच्या जीवावर बेतले; दुचाकी दुभाजकावर आदळली, हेल्मेट परिधान केलेले तरीही…

दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला.

student died bike accident
अकोला : सहलीला जाणे युवकाच्या जीवावर बेतले; दुचाकी दुभाजकावर आदळली, हेल्मेट परिधान केलेले तरीही… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अकोला : दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, छातीला दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.

हेही वाचा – भंडारा : ‘शासन आपल्या दारी’मुळे खोळंबली एसटीची वारी; प्रवाशांचे हाल, शाळांना सुट्टी

nanded death tragedy
नांदेड मृत्यू प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल; चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश
yavatmal mentally retarded girl rape, 25 year old girl raped in yavatmal, digras police station
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर गुराख्याचा बलात्कार, कुऱ्हाड घेऊन मागे…
new twist in the molestation case
विनयभंग प्रकरणात नवे वळण, विद्यार्थिनींचे पालक म्हणतात ‘ते’ निर्दोष…
bus accident in buldhana, buldhana, student died in accident ,
बुलढाणा: भरधाव टिप्परची ऑटोला धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू; सहा जखमी

हेही वाचा – Gautami Patil : गौतमीचा ‘कच कच कांदा’ गाण्यावर नाच आणि स्क्रिनवर विश्वचषक फायनलचा थरार

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी पातूरजवळ असलेल्या दुधाना येथे सहलीला जात होते. त्यात गौरांगचाही सहभाग होता. दुचाकीवर असलेल्या गौरांग आंबेकर याची गाडी पातूर घाटात घसरली. त्यानंतर तो दुभाजकावर आदळला. त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर सोबत असलेल्या मित्रांनी त्याला उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुचाकीवर स्वार होताना गौरांगने हेल्मेट घातलेले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student died after bike accident at patur ghat ppd 88 ssb

First published on: 20-11-2023 at 13:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×