scorecardresearch

स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली ; नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही…

मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली.

students school bus travelling not safe Violation rules by schoolbus driver nagpur
स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली, नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही…

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने शालेय वाहन (स्कूलबस) बाबत नियम घालून दिले. परंतु जास्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने बरेच स्कूलबस चालक नियमांची पायामल्ली करत आहेत. बुधवारी ऑटोमोटिव्ह चौकात चक्क ३१ मुले बसवलेले एका ९ सिटर शालेय वाहन आरटीओने पकडले. त्यातील डिक्कीतही मुलांना कोंबलेले बघत हे वाहनच जप्त करण्यात आले.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

आरटीओकडून सध्या जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि प्रवासी वाहनांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. या अभियानाअंतर्गत कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकात एक शालेय वाहन विद्यार्थ्यांनी कोंबलेल्या अवस्थेत आरटीओच्या पथकाला जाताना दिसले. या बसला थांबवल्यावर आत डिक्कीसह सर्वत्र ३१ मुले कोंबल्यासारखी भरलेली बसवल्याचे बघत आरटीओच्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. हे शालेय वाहन कामठीतील अविनाश उच्च माध्यमीक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करत होते. ही मुले कामठीत शाळेत जात होती.
मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली. त्यानुसार शालेय वाहनाच्या मागे आरटीओचे वाहन शाळेपर्यंत गेले. मुलांना शाळेत सोडल्यावर हे वाहन कळमना येथे जप्त करण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

सोबत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील प्रशासनाला या पद्धतीने शालेय वाहनामध्ये मुलांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे सांगत या मुलांना पुन्हा घरी सोडण्याची जबाबदारी शाळेची असल्याचे कळवले. त्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना सोडण्याची हमी घेतल्यावर आरटीओचे पथक तेथून परतले.शालेय वाहनामध्ये जास्तीत जास्त मुले यावी म्हणून नियम धाब्यावर बसवून बसचालकाने त्याच्या बैठक व्यवस्थेच्या संरचणेतच बदल केले होते.

हेही वाचा : स्वच्छतागृहाअभावी महिला रेल्वे इंजिन चालकांची कुचंबणा

सोबत दोन सिटच्या मधात लाकडी बाकडे लावून त्यावरही दोन्ही बाजूने मुले बसवली गेली होती. तर गाडीच्या डिक्कीतही मुले कोंबण्यात आल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले.शालेय मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पालकांचीही आहे. त्यांनी या पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालू नये. क्षमतेहून जास्त प्रवाशांची वाहतूक कुणी शालेय वाहन चालक करत असल्यास आरटीओत तक्रार करावी. नियम मोडणाऱ्या ‘स्कूलबस’वर पुढेही कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 09:27 IST

संबंधित बातम्या