नागपूर : स्वत:वर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका युवकाचा भरचौकात तलवारीने भोसकून खून केला. नववर्षाच्या पहिल्या तीन दिवसात दोन हत्याकांड उपराजधानी घडले असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हत्याकांडाची घटना सक्करदरा ठाण्यांतर्गत भारत माता चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली.

पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. शेख फिरोज शेख मोइनुद्दीन (५०) रा. यासीन प्लॉट, मोठा ताजबाग असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये मोहम्मद शाकिब सारिक अंसारी (१९) रा. महेंद्रनगर आणि शेख फैज शेख फिरोज (१८) रा. यासीन प्लॉट, मोठ ताजबागचा समावेश आहे.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

हेही वाचा >>> बुलढाणा: निवृत्त विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

आशीर्वादनगरच्या भारत माता चौकाजवळ फिरोज आणि त्याच्या भावाचा पानठेला आहे. काही जणांवर गुन्हेही नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. मोठा ताजबाग परिसरातच राहणाऱ्या आसिफ घोडाशी शेख बंधूंचे अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. जवळपास ६ महिन्यांपूर्वी फिरोजचा लहान भाऊ शेख फारुखने ताजबागच्या समोसा मैदानाजवळ आसिफवर हल्ला केला होता. या प्रकरण्यात त्याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला. फिरोजला अंमली पदार्थाची नशा करण्याचे व्यसन आहे. हे व्यसन सोडवण्यासाठी त्याला नशा मुक्ती केंद्रातही दाखल करण्यात आले होते. १५ दिवसांपूर्वीच तो नशा मुक्ती केंद्रातून घरी आला होता. मंगळवारी दुपारी फिरोज त्याच्या दुकानाजवळील मोचीकडे चप्पल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. या दरम्यान शाकिब आणि फैज तेथे आले.

हेही वाचा >>> पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

दोघांनीही तलवारीने फिरोजवर हल्ला केला. फिरोज घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचे भाऊ मदतीला पोहोचण्यापूर्वीच आरोपी दुचाकीवर बसून फरार झाले होते. फिरोजला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस उपायुक्त विजयकांत सागरसह सक्करदरा आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळावर पोहोचले. दोन्ही आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी आरोपींना कामठी परिसरातून अटक केली. चौकशीत शाकिबने सांगितले की, ६ महिन्यांपूर्वी फारुखने त्याचा मामा आसिफ घोडावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने फिरोजवर हल्ला केला. मात्र पोलिसांना संशय आहे की, हा हल्ला आसिफच्या इशाऱ्यावर करण्यात आला आहे.