scorecardresearch

Premium

आयएएसचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ध्येयवेड्या सोहमचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक!

एका व्हिडीओमुळे संपूर्ण राज्यात लोकप्रिय झालेल्या ध्येयवेड्या सोहम उईके याच्या गुणांचे कौतुक करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला खास पुस्तकांची भेटही दिली.

Sudhir Mungantiwar praised Soham uikey
डोंगरहळदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सोहम उईके याने अलीकडेच मुनगंटीवार यांची भेट घेतली. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ‘नव्या पिढीमध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करायची असेल, तर त्यांच्या गुणांचे कौतुक केले पाहिजे’, या तत्वावर विश्वास ठेवणारे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली.

huge employees crowd in pension court of guardian minister mangal prabhat lodha
मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पेन्शन अदालतमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी; ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी
Chandrashekhar Bawankule (1)
पत्रकारांना सांभाळण्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावरून वाद
kdmc commissioner order to fill potholes in dombivli kalyan
रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश
Gita Gopinath
पीएम मोदींचे ‘हे’ मोठे स्वप्न येत्या ४ वर्षांत पूर्ण होणार, भारत अनेक बड्या देशांना मागे टाकणार, IMF च्या गीता गोपीनाथ यांच्याकडून शिक्कामोर्तब

एका व्हिडीओमुळे संपूर्ण राज्यात लोकप्रिय झालेल्या ध्येयवेड्या सोहम उईके याच्या गुणांचे कौतुक करताना त्याला खास पुस्तकांची भेटही दिली. पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सोहम उईके याने अलीकडेच मुनगंटीवार यांची भेट घेतली. सोहम आठव्या वर्गाचा विद्यार्थी असून त्याला आयएएस व्हायचे आहे.

आणखी वाचा-“नागपुरात आलेला पूर मानवनिर्मित! नागनदीचा नाला कोणी केला,” विकास ठाकरे यांचा सवाल

खरेतर सगळीच मुले बालपणी काही स्वप्न बघत असतात. पण ते स्वप्न गाठण्यासाठी काय करायचे असते, याची माहिती मुलांना नसते. सोहम उईके याला अपवाद आहे. तो आठव्या वर्गात असला तरीही आयएएस होण्यासाठी काय गरजेचे आहे, याचे ज्ञान त्याला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने आयएएस होण्याची जिद्द पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यांनी त्याच्यासोबत झालेल्या गप्पांचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आणि सोहमची जिद्द बघता बघता सर्वदूर व्हायरल झाली. सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही ही त्याची माहिती आली. दरम्यान, सोहमच मुनगंटीवार यांच्या भेटीला आला. दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. या गप्पांमधून मुनगंटीवार यांनी सोहमचे आवडते विषय जाणून घेतले. त्यात सोहमने इतिहास, राज्यशास्त्र व भुगोलाची आवड असल्याचे सांगीतले आणि खास करून, इतिहास हा विषय अधिक आवडतो असे सांगितले.

आणखी वाचा-पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या…

त्यानंतर लगेच त्याच्या आवडीच्या विषयांची पुस्तके मुनगंटीवार यांनी सोहमला भेट दिली. यावेळी प्रदेश महामंत्री महिला मोर्चा अल्का आत्राम, ज्योती बुरांडे माजी उपसभापती, धनराज सातपुते उपसरपंच,सोहमचे मामा उपस्थित होते.

आनंद गगनात मावेना

चक्क राज्याच्या वने व सांस्कृतिक मंत्री यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि एवढेच नव्हे तर आपल्या आवडीची पुस्तकेही भेट दिली… हा अनुभव घेताना सोहम उईकेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सोहमच्या कुटुंबियांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantiwar praised soham uikey who dreams of becoming an ias rsj 74 mrj

First published on: 26-09-2023 at 14:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×