scorecardresearch

सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान हा अदृश्य हात करीत आहे, असे विधान सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

Supriya Sule criticizes BJP
सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, "दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात" (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर – दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान हा अदृश्य हात करीत आहे, असे विधान सुप्रिया सुळे यांनी येथे केले. त्या नागपूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे नुकसान केले आहे.

Chandrakant Khaire
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
NCP Vidarbha
धनंजय मुंडेंचा ‘हा’ सल्ला सुप्रिया सुळेंना पटेल?
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
Manoj Jarange Prithviraj Chavan
“पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले…

हेही वाचा – अकोला : महापारेषणमध्ये भंगार विक्रीचा घोटाळा; अनियमिततेचा ठपका ठेवत आठ अधिकाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी ६१ पैसे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप

भाजपाकडून ‘आईस’ वापर

सुळे यानी भाजपावर आरोप करताना ‘आईस’ शब्द वापरला. आय म्हणजे इनकम टॅक्स, सी म्हणजे सीबीआय आणि ई म्हणजे ईडी, असे त्या म्हणाल्या. याचा वापर भाजपा पक्षफोडी करते, असा आरोप त्यांनी केला

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule criticizes bjp in nagpur says delhi invisible hand against maharashtra tpd 96 ssb

First published on: 01-10-2023 at 20:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×