नागपूर : कोराडी व खापरखेडा औष्णिक केंद्रामुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत प्रत्येक ऋतूत औष्णिक केंद्र परिसराचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करा, या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाजनको, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे प्रतिनिधी आणि परिसरातील गावाच्या सरपंचांचा समावेश असणारी समिती तयार करा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाने महाजनकोला दिले आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चार फेब्रुवारीला कोराडी व खापरखेडा औष्णिक केंद्र परिसराची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी औष्णिक केंद्रातून बाहेर पडणारी राख आणि परिसरातील जलसाठय़ाची तपासणी केली.  सहा ठिकाणचे नमुने घेतले. आता याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात परिसरातील जलसाठे आणि राखेची वारंवार तपासणी करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.

wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार
earthquakes in umarkhed earthquake of magnitude 4 5 strikes maharashtra s hingoli
हिंगोलीतील भूकंपाचे धक्के उमरखेडमध्येही? घाबरू नका, सतर्कतेचे आवाहन
Kandalvan Ulwe node
उलवे नोडमध्येही कांदळवनावर भराव, सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

राख बंधाऱ्याभोवती हरितपट्टे

खापरखेडा औष्णिक केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या बंधाऱ्यासभोवताल हरितपट्टे तयार करण्याचे आदेश या अहवालात देण्यात आले आहेत. तो तयार करताना प्रदूषण शोषून घेणाऱ्या व पर्यावरण कायम राखणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे रोपण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राखेसोबतच बाहेर पडणाऱ्या ‘मक्र्युरी’ या धातूचा पाणी, वनस्पती आणि मनुष्यावर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे कन्हान नदी प्रदूषित झाली आहे. या नदीचे प्रदूषण सुधारण्यासाठी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देशही या अहवालात देण्यात आले आहे.

खैरी नाल्यातील पाण्यात ‘मर्क्युरी’ नाही

सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या चमूने खैरीच्या नाल्यातील पाण्यात ‘मर्क्युरी’ असल्याचा दावा केला होता. केंद्राच्या चमूने प्रदूषणाबाबतचे सर्व दावे जवळजवळ मान्य केले असून हा दावा मात्र फेटाळून लावला आहे. खैरी नाल्यातील पाण्यात ‘ मर्क्युरी ’ नसल्याचे या अहवालात नमूद आहे. मात्र, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या अहवालातील या मुद्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तपासणीसाठी चुकीच्या पद्धतीने नमुने गोळा करण्यात आले. नमुने गोळा केल्यानंतर त्वरित तपासणी करणे आवश्यक असताना ती झालेली नाही. याशिवाय नमुने तपासणीसाठी कोणती पद्धत वापरली ते देखील अहवालात स्पष्ट केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.