यवतमाळ : मुंबईतील राजकीय रंगमंचावर गुरुवारी सायंकाळी जो शपथविधी सोहळा पार पडला. त्याने राज्यभरात अनेक राजकीय कार्यकर्त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शपथ घेतली, मात्र याव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी न होणे, हे कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरले. यामुळे मुंबईतील सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

सरकार स्थापनेच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचे वारे वाहणे सुरू झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली. महायुती सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन प्रमुख आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड, भाजपचे राळेगावचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके आणि पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. ही नावे जणू खात्रीने निवडली जातील, असे वातावरण होते. समर्थकांचा उत्साह इतका वाढला होता की, त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी बुधवारी विशेष विमानांचे तिकीट काढून, खासगी वाहतूक करून मुंबई गाठली.

chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
Eknath shinde Shiv Sena focus pune municipal elections
पुणे : शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष, महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू
Pune Municipal Corporation will spend 300 crores to fulfill Prime Minister Narendra Modi's dream Pune print news
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका करणार ३०० कोटी खर्च ?
Ashwini Vaishnaw news in marathi
नवा विदा संरक्षण कायदा नागरिकांना सक्षम करेल…

हेही वाचा…आशिया, सायबेरिया, मंगोलियाचे ‘पाहुणे’ उतरले चंद्रपुुरात…चक्क हिमालय पर्वत ओलांडून…

मुंबईतील सोहळ्याचे रंगारंग दृश्य अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. शपथविधीच्या मंचावर आपल्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ घेताना पाहण्याचे स्वप्न अनेक कार्यकर्त्यांनी उराशी बाळगले होते. काही कार्यकर्त्यांनी हा क्षण साजरा करण्यासाठी खासगी हॉटेल्समध्ये तयारी केली होती, तर काहींनी आपल्या नेत्याचा विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी मोठमोठ्या फटाके आणि वाजंत्रीचा बेत आखला होता.

मात्र शपथविधी सोहळ्यास पोचल्यानंतर, शपथविधीत केवळ तीनच नेते सामील होणार आहेत, हे कळल्यावर कार्यकर्त्यांची निराशा चरमसीमेला पोहोचली. तिघांव्यातिरिक्त कोणीही मंत्रिपदाची शपथ न घेतल्याने कार्यकर्त्यांनी निराश होवून परतीचा प्रवास सुरू केला. तर नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या शनिवारपासून सुरू होत असल्याने आमदार सध्या मुंबईत त ठोकून आहेत.

हेही वाचा…‘या’ गावात आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या अस्‍थी

आता सर्व नजरा ११ डिसेंबरवर

अनेकांचे मंत्रीपदाचे स्वप्न मात्र अजून पूर्ण झालेले नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ११ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी होईल, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मुंबईत निराश झालेले कार्यकर्ते आता पुन्हा एकदा नवी आशा उराशी बाळगून दुसऱ्या शपथविधी सोहळ्याची वाट पाहत आहे.

Story img Loader