scorecardresearch

ताडोबा प्रशासनाचे आवाहन; म्हणाले, ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आळा घाला

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीच्या मृत्यूची अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने प्रशासनही हादरले आहे.

to curb Maya tigress death rumours
वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आवर घालावा, असे आवाहन ताडोबा प्रशासनाने केले आहे.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीच्या मृत्यूची अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने प्रशासनही हादरले आहे. प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने ‘माया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१२’ वाघिणीला मृत घोषित केलेले नाही. त्यामुळे या वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आवर घालावा, असे आवाहन ताडोबा प्रशासनाने केले आहे.

Maharera
विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले?
bmc
देवनार मध्ये पालिकेच्या भूखंडाचा विकास; ३०० चौरस फुटाच्या ३३५८ सदनिका उपलब्ध होणार
Nana Patole criticized Devendra Fadnavis
“फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

‘टी-१२’ नावाच्या वाघिणीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी १८ नोव्हेंबरला या कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकाचा समाजमाध्यमांवर चुकीचा अर्थ लावण्यात आला. यात प्रशासनाने या वाघिणीला मृत घोषित केल्याचे त्यावर प्रकाशित करण्यात आले. मात्र, हे चूकीचे असल्याचे या व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-एसटीच्या बुलढाणा विभागाची ‘दिवाळी’!…. ‘लालपरी’ला साडेपाच कोटींचे उत्पन्न

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणि आसपासच्या ‘टी-१२’ च्या स्थानावर लक्ष ठेवण्यासाठी गस्त आणि कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. १८ नोव्हेंबरला गस्तीदरम्यान गोळा केलेल्या हाडांचा नमुना पुढील विश्लेषणासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्र येथे पाठवण्यात आला आहे. या केंद्रात हा कोणता प्राणी आहे, नर आहे की मादी आहे याचे परिक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. त्यामुळे या कार्यालयाकडून जोपर्यंत अधिकृत प्रसिद्धीपत्रक येत नाही, तोपर्यंत यासंदर्भात कोणत्याही अफवा पसरवणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tadoba administration orders to curb maya tigress death rumours rgc 76 mrj

First published on: 21-11-2023 at 20:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×