scorecardresearch

VIDEO : ‘छोटी मधु’चे मन जिंकण्यासाठी ‘पारस’ व ‘तारू’ एकमेकांशी भिडले; पहा दोन वाघांमधील तुंबळ झटापट

पारस व तारू यांच्यातील झटापटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला प्रचंड लाईक्स मिळत आहे.

VIDEO : ‘छोटी मधु’चे मन जिंकण्यासाठी ‘पारस’ व ‘तारू’ एकमेकांशी भिडले; पहा दोन वाघांमधील तुंबळ झटापट
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘छोटी मधु’ या वाघिणीचे मन जिंकण्यासाठी तथा हद्दीसाठी पारस व तारु या दोन वाघांमध्ये तुंबळ झटापट झाली. पारस व तारू यांच्यातील झटापटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला प्रचंड लाईक्स मिळत आहे. दोन वाघांमधील ही लढाई वनविभाग व वन्यजीव प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारी व्याघ्र भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोमवारी पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. ताडोबाच्या मोहरली वन परिक्षेत्रतील आगरझरी बफर झोनमध्ये पर्यटक सफारीचा आनंद लुटत असताना सोनलकुमार आवारी व रघु रामा या दोन पर्यटकांनी वाघांच्या लढाईचा अतिशय दुर्मिळ व्हीडिओ टिपला.

व्हिडिओ :

छोटी मधु या वाघिणीचे मन जिंकण्यासाठी तसेच हद्द ठरवण्यासाठी पारस व तारु या दोन वाघांमध्ये ही तुंबळ झटापट झाली. छोटी मधूसमोर हे दोन्ही वाघ एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांना आवाहन देतात. डरकाळी फोडून लढाईसाठी सज्ज असल्याचे संकेत देतात. त्यानंतर ते घनदाट जंगलात निघून जातात. वाघांच्या या लढाईच्या व्हीडिओने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 11:54 IST

संबंधित बातम्या