नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली परिसरात रस्त्यावर वाघ दिसल्यामुळे स्थानिकांनी वाहनांमधून खाली उतरून फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या बेजबाबदार आणि धोकादायक प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ताडोबा नेहमीच ‘हाऊसफुल्ल’, पण..

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी नागरिकांची नेहमीच हाऊसफुल्ल गर्दी असते. ताडोबा बाहेरही वाघांचे दर्शन नित्याची बाब झाली आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या रस्त्यांवरही वाघांचे ये जा करणाऱ्यांना दर्शन होतात. त्यामुळेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर मोहुर्ली मार्गाने दर शनिवारी व रविवारी चंद्रपूरातील नागरिक वाहने घेऊन वाघांच्या दर्शनासाठी भ्रंमती करतात. अशाच एका सुटीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील काही नागरिक वाहनांनी या मार्गाने भ्रमंती करून वाघांचे दर्शन होताच चांगलाच धिंगाना घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा चंद्रपूर ते मोहर्ली हा मार्ग २० किलो मिटरचा आहे. या मार्गावर काही उपद्रवी नागरिकांनी या मार्गाने भ्रमंती केली.

वाहनाखाली उतरून सेल्फी

दरम्यान, त्यांची भ्रमंती सुरू असतानाच वाघाचे त्याच रस्त्यावर दर्शन झाले. त्यामुळे व्याघ्र दर्शनाने उपद्रवी नागरिकांना आपला मोह आवरता आला नाही. काही वाहनातील नागरिक खाली उतरून वाघांसोबत सेल्फी करण्याचा प्रत्यन करून लागले तर काहींनी जवळून खालील उतररून बघण्याचा प्रत्न केला. फुकटात आणि रत्यावरच वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. ताडोबाच्या रस्त्यावरून नियमभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुचाकीवरून जाणारे नागरिक वाहनांच्या खाली उतरले आणि वाघाच्या जवळ जात मोबाईल मधून त्या वाघाचे फोटो घेऊ लागले. मात्र, त्याचवेळी जर वाघाने हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

आता पर्यंत २८ लाखांचा दंड वसूल

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात उपद्रवी पर्यटकांनी धिंगाना घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याचेवर ५ हजाराचा दंड ठोठावण्यात येतो. आता पर्यंत ताडोबा मध्ये पर्यटनाला येऊन उपद्रवीपणा करणाऱ्या लोकांकडून सुमारे २८ लाखांचा दंड तिन वर्षात ठोठावण्यात आला आहे. परंमु मोहुर्ली मार्गावर चंद्रपूरातील काही व्यक्तींचा उपद्रवीपणा वाढत असल्याने वन्यजिव प्रेमींनी चिंता व्यक्त् केली आहे. याकरीता कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ही गर्दी रोखण्यात वनप्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा या व्हिडिओनंतर दिसून आले आहे.