scorecardresearch

Premium

वर्धा : आश्रमशाळा विनयभंग प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल

देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील चिमुरड्या मुलींवरील ओढवलेल्या अश्लील प्रकारची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज चौकशीस प्रारंभ केला.

Navjeevan Ashram School
वर्धा : आश्रमशाळा विनयभंग प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

वर्धा : देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील चिमुरड्या मुलींवरील ओढवलेल्या अश्लील प्रकारची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज चौकशीस प्रारंभ केला. महिला नायब तहसीलदार तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची चमू नेमली. हे अधिकारी आश्रमशाळेत भेट देत विचारपूस करणार. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानंतर कारवाईस सुरवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “दिव्यांगांसाठीच्या उपक्रमात येण्यास नेते अनुत्सुक”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

company manufactures liquor adopted school
धक्कादायक! मद्य कंपनीने सरकारी शाळा घेतली दत्तक, दिवसा भरवली शाळा, तर रात्री गौतमी पाटीलचा कार्यक्रम
ganesh agman
तब्बल ३०८ गावांत एकाच गणपतीची स्थापना; बुलढाणा जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप
Loan Waiver Eligible Farmers
पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित का ठेवले? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शासनाला विचारणा
Satara riots
Satara Riots: सातारा दंगलप्रकरणी आणखी १५ जणांना कोठडी; जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता

हेही वाचा – एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत दोन लाखांचा दंड

तसेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. लोकसत्ताने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर विविध नेत्यांनी यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. खासदार रामदास तडस यांनी ही बाब आदिवासी मंत्र्यांकडे उपस्थित करणार असल्याचे सांगितले. आदिवासी नेते अवचितराव सयाम हे प्रत्यक्ष भेट देणार आहे. या आश्रमशाळेतील पाचव्या वर्गातील मुलींशी एका कर्मचाऱ्याने अश्लील चाळे केल्याची तक्रार येथीलच अधिक्षिकेने देवळी पोलिसांकडे केली, हे विशेष.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taking cognizance of molestation with little girls in navjeevan ashram school in deoli taluka wardha district collector rahul kardile started an investigation pmd 64 ssb

First published on: 27-09-2023 at 15:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×