scorecardresearch

नागपूर : शिक्षक उमेदवार अडबाले यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार, म्हणाले…

महाविकास विकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली होती.

नागपूर : शिक्षक उमेदवार अडबाले यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार, म्हणाले…
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : काँग्रेसने अनेक दिवसांच्या मंथनानंतर अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी आज जाहीर केले. त्यानंतर सुधाकर अडबाले यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले. तसेच महाविकास आघाडीच्या समर्थनामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर : सुनील केदार यांची उमेदवारीबाबत मोठी घोषणा..; काँग्रेसचा शिक्षक मतदारसंघात यांना पाठिंबा

अडबाले यांना पाठिंबा मिळावा म्हणून पहिल्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, माजी सुनील केदार प्रयत्नशील होते. महाविकास विकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली होती. त्यांच्याकडून गंगाध नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ऐनवेळी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला होता. परंतु काँग्रेसने कोणालाच पाठिंबा जाहीर केला नसल्याने संभ्रम होता.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या