scorecardresearch

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नक्षलवादग्रस्त गडचिरोलीत दोन तासांत १२ टक्के मतदान

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समवेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तेथील नक्षलवांद्यांच्या हालचाली लक्षात घेता प्रशासन काळजीत असते.

Teacher Constituency Election Gadchiroli
नक्षलवादग्रस्त गडचिरोलीत दोन तासांत १२ टक्के मतदान (image – लोकत्ता टीम)

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सोमवार सकाळी आठ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समवेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तेथील नक्षलवांद्यांच्या हालचाली लक्षात घेता प्रशासन काळजीत असते. मात्र ‘शिक्षक’च्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बाहेर पडू लागले असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते ९ या दोन तासात १२.८६ टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा – राष्ट्रीय महामार्गावरील काळविटांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक: भाजपा उमेदवार रणजीत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप!

नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाने सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ केली आहे. या ठिकाणचे मतदान तीन वाजता संपेल. नागपुरातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील ४५ केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:00 IST