नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी १ आक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू होणार आहे. या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागते हे येथे उल्लेखनीय. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी नोंदणी कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून मतदार नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.

यादीवरील दावे व हरकती २५ डिसेंबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम यादी ३० डिसेंबरला प्रसिद्ध होईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये १ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन टप्प्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या नावाची नोंदणी करण्याची संधी आहे.नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०१६ ते १ नोव्हेंबर २०२२ या काळात ज्या शिक्षकांनी सलग तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली असेल ते नोंदणीसाठी पात्र ठरतील. मतदार नोंदणी करताना शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Yavatmal Washim Lok sabha Constituency, Election Writ Petition, Alleges False Affidavit, sanjay deshmukh, Maha vikas Aghadi Candidate , lok sabha 2024, mumbai high court, yavatmal news, uddhav thackeray shivsena, washim news,
यवतमाळ : शिवसेना (उबाठा)चे संजय देशमुखांवर खोटी माहिती दिल्याचा आरोप
rashmi barve
रश्मी बर्वे निवडणुकीपासून दूरच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक