नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी | teacher Constituency Election Voter Registration started from October first nagpur | Loksatta

नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी नोंदणी कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी १ आक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू होणार आहे. या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागते हे येथे उल्लेखनीय. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी नोंदणी कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून मतदार नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.

यादीवरील दावे व हरकती २५ डिसेंबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम यादी ३० डिसेंबरला प्रसिद्ध होईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये १ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन टप्प्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या नावाची नोंदणी करण्याची संधी आहे.नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०१६ ते १ नोव्हेंबर २०२२ या काळात ज्या शिक्षकांनी सलग तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली असेल ते नोंदणीसाठी पात्र ठरतील. मतदार नोंदणी करताना शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्यास मालमत्ता करात मिळणार २ टक्के सूट

संबंधित बातम्या

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
पोलीस ठाण्यात चक्क पोलिसच खेळतात जुगार!; व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…
हृदयद्रावक! ‘त्या’ बेपत्ता चिमुकलीचा मृतदेहच आढळला
वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार; आरोपीस अटक
संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…
‘JNU’ मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणा; शर्लिन चोप्राने केला तीव्र शब्दांत निषेध, म्हणाली, “केंद्र सरकार…”
तुमचाही मुलगा हातात मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही? जाणून घ्या मुलांची ही सवय सोडवण्याचे उपाय
“यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!