अमरावती : इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तिन्ही हप्ते मिळाले, दिवाळीपूर्वी वेतनही झाले; परंतु जिल्हा परिषद शिक्षकांना अद्यापही थकीत हप्ते मिळाले नाही, दिवाळीपूर्वी वेतनही झाले नाही. या धोरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात शिक्षकांनी बुधवारी काळ्या फिती लावून तसेच शासनाला १ रुपयाची मनिऑर्डर पाठवून निषेध नोंदवला.

हेही वाचा >>> गडचिरोली : नक्षल्यांनी केली सहकाऱ्याचीच हत्या; पोलीस खबरी असल्याचा पत्रात आरोप

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक

वेतन व हप्ते त्वरित मिळावे, या मागणीसाठी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे व कक्ष अधीक्षक प्रसन्न पंत यांना शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, महीला आघाडी प्रमुख सरिता काठोळे यांनी निवेदन सादर केले. ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे शिक्षक वगळता सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनासाठी अल्प अनुदान दिल्यामुळे अमरावती जिल्ह्यासह २५ जिल्हा परिषदांच्या शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी होऊ शकले नाही. तसेच सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात व रोखीने अदा करण्यात आला. परंतु जिल्हा परिषद शिक्षकांना मात्र दुसरा व तिसरा हप्ता अद्याप देण्यात आला नाही. शासन हे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे. शासनाच्या या धोरणाप्रति शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून व शासनाला १ रुपयाची मनिऑर्डर करून आपला निषेध व्यक्त केला. शाळेच्या पहिल्या दिवशी पुन्हा ११ तारखेला काळ्या फिती लावण्याचा निर्धार शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> नागपूर : कंत्राटी प्राध्यापकांच्या पदरी पदवीधर निवडणुकीतही उपेक्षाच

अमरावती जिल्हा शाखेच्या कडून आज अमरावती जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे राजेश सावरकर, संभाजी रेवाळे, सरिता काठोळे, विनीता घुलक्षे, प्रफुल्ल वाठ, संतोष राऊत, उमेश चुनकीकर, चंद्रकांत कुरळकर, अब्दुल खलील, राजू विरुळकर, मनीष काळे, सचिन राऊत, विजय राऊत, अनुप डिके, सुरेंन्द मेटे, आदी उपस्थित होते.

इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते मिळाले आहेत तसेच दिवाळीपूर्वी वेतनही झाले आहे. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळाले नाहीत तसेच अद्यापही ऑक्टोबर महिन्याचे वेतन झाले नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ९ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला आहे.

– राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती.