गडचिरोली : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीवर रामभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून आलापल्ली वनविभागातील सागवान ओळखल्या जाते. ब्रिटनपासून नव्या संसद भवनासाठी येथील सागवानचा वापर करण्यात आला आहे. आता हेच सागवान अयोध्येत राम मंदिराचे प्रवेशद्वार आणि गर्भगृहाची शोभा वाढवणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहात आलापल्ली येथील रामभक्तांनी २६ मार्च रोजी काष्ठपूजन केले व शहरातून शोभायात्रा काढली. दुसरीकडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी हे सागवान बल्लारपूर येथून पाठवण्यात येणार आहे, असे सांगून २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा >>> नागपूर : उपराजधानीत रुग्णाच्या नातेवाईकांना चक्क हातावर लिहून दिले ‘प्रिस्क्रिप्शन’!

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन विकास महामंडळ) आलापल्ली यांनी त्यादिवशी आलापल्ली येथील शोभायात्रा विनापरवानगी काढण्यात आली, अशी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या या कृतिविरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. एकंदरीत, राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या सागवानावरून आणि शोभायात्रेवरून श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान जात आहे. ही रामभक्तांसाठी आनंदाची बाब आहे. म्हणून नागरिकांनी पूजा केली. यात तक्रार करण्यासारखे काहीही नाही, असे टायगर ग्रुपचे साई तुलसीगिरी यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या विभागाची परवानगी नसतानाही काही लोकांनी राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या सागवानाची पूजा केली व शोभायात्रा काढली. यामुळे आमच्यावर वरिष्ठांकडून कारवाई केली जाऊ शकते. म्हणून, ज्यांनी शोभायात्रा काढली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार मी पोलिसांत दिली. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, असे आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी पांडुरंग भोये यांनी म्हटले आहे.