गोंदिया : जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे किशोरवयीनसह चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाच्या चटक्यांचा त्रास प्रकर्षाने जाणवत असल्याने जिल्हा परिषदेने सोमवार, १३ मार्चपासून गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ पाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी शनिवार, १० मार्चला पत्र काढले आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याचे पाहून व विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता जिल्हा परिषदेंतर्गत सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा सोमवार, १३ मार्चपासून  येत्या ३० एप्रिलपर्यंत सकाळ पाळीत भरविल्या जाणार आहेत.

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड
Pune District, House Purchase, 23 percent Rise, Government, Collects Rs 620 Crore, Stamp Duty,
पुण्यात घरांची खरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

हेही वाचा <<< चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

शाळा सकाळी ७ ते ११.०५ वाजता या वेळेत भरविण्यात येणार असून शाळांचे पहिले सत्र सकाळी ७.०५ ते ९.३० वाजेपर्यंत राहील. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० वाजता या वेळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येणार असून, शाळांचे दुसरे सत्र सकाळी १० ते ११.०५ वाजता राहील. शाळा सकाळ पाळीत भरविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच आरटीई निकषानुसार तासिका पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.