लोकसत्‍ता टीम

अमरावती : अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठच्‍या उड्डाणपुलावर संभाव्‍य भीषण अपघात टळला असून एसटी बसचालकाच्‍या प्रसंगावधानामुळे ८२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. बसमध्‍ये तांत्रिक बिघाड झाल्‍याचे लक्षात येताच बसचालकाने रस्‍त्‍याच्‍या समोरील टिप्‍परला धडक देत बस थांबवली. अन्‍यथा उतारावर असलेली ही बस पुलावरून खाली कोसळण्‍याचा धोका होता. ही थरारक घडना रविवारी दुपारी घडली.

Father and son tragically die in an accident in Chandrapur
खेळ कुणाला दैवाचा कळला? ‘त्या’ बापलेकाची एकत्र अंत्ययात्रा; समाजमन सुन्न…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Palkhi at home of Saint Gajanan Maharaj Lakhs of devotees gather in Shegaon
संत गजानन महाराजांची पालखी स्वगृही; शेगावात लाखांवर भाविकांची मांदियाळी
Many trains cancelled due to mega block of railways
रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे अनेक गाड्या रद्द
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
What to do if your brakes fail while driving rto officer told easy trick
अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? आरटीओ अधिकाऱ्याने सांगितली सोपी ट्रिक, Video एकदा पाहाच
Government employees on strike again for old pension What was decided in coordination committee meeting
जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत काय ठरले?

एस टी महामंडळाची बस क्रमांक एम एच ४० वाय ५८७१ नागपूरहून प्रवाशांना घेऊन निघाली होती. या बसमधून चालक आणि वाहकासह ८२ प्रवासी होते. ही बस नांदगावपेठ येथील उड्डाण पुलावरून मार्गक्रमण करीत होती. अचानक पुलावर एसटी बसचे स्टेअरिंग अडकल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता समोर चालत असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस धडक देत बस नियंत्रित केली. नंतर सर्व प्रवाशांना खाली उतरविण्‍यात आले. जर बसवर नियंत्रण मिळवता आले नसते, तर नांदगावपेठ उड्डाण पुलावरून ही बस खाली कोसळून अनेक प्रवाशांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला असता, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस मधील ८० प्रवासी आणि दोन कर्मचारी अशा ८२ लोकांचे प्राण वाचले. या सतर्क एसटी चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले आहे.

आणखी वाचा-जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत काय ठरले?

बसचालकाने ही बस जेव्‍हा चालविण्‍यास घेतली, तेव्‍हा ती सुस्थितीत होती, पण नांदगावपेठ जवळ येताच अचानकपणे बसचे स्‍टेअरिंग अडकून पडले. यावेळी ब्रेक दाबून बसवर नियंत्रण मिळवणे कठीण होते, पण चालकाने वेळीच सावध होऊन ट्रकच्‍या मागील बाजूला धडक दिली आणि बस थांबवण्‍यात यश मिळवले.

गेल्‍या मार्च महिन्‍यात मेळघाटातील सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात दोन महिलांचा मृत्‍यू झाला होता २५ जण जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याचे निदर्शनास आले होते. एसटी महामंडळात नादुरूस्‍त बसगाड्यांची संख्‍या वाढल्‍याचेही सांगण्‍यात येत आहे.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत पुन्हा चूक; नेमकं काय घडलं?

राज्य शासन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून विविध सेवा घोषित करीत आहे. नुकताच त्यात अमृत महोत्सव, महिला सन्‍मानसारख्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांची संख्या सतत वाढत असतानाही राज्य परिवहन महामंडळाचे मात्र बसेस व्यवस्थेकडे दुर्लक्ष आहे. परिणामी सवलतीच्या योजनेत सातत्याने भर पडत असताना मात्र एसटीची सेवा खिळखिळीच आहे. नादुरूस्‍त बसगाड्यांमुळे फेऱ्यांवर परिणाम होत असल्याची ओरड प्रवाशांकडून करण्यात येत आहे.