scorecardresearch

Premium

दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय?

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सेवा दिलेले व सध्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात कार्यरत डॉ. अरविंद कुऱ्हाडे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे.

350th Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Day celebrated South American country 6 June
दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवछत्रपती राज्याभिषेक दिन ६ जुनला दक्षिण अमेरिकेतील त्रिनिदाद आणि टोबॅगो देशातही साजरा होईल. येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सेवा दिलेले व सध्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात कार्यरत डॉ. अरविंद कुऱ्हाडे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे. दक्षिण अमेरिकेतून डॉ. कुऱ्हाडे लोकसत्ताशी भ्रमनध्वनीवर बोलतांना म्हणाले, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फाॅर कल्चरल कार्पोरेशन (एमजीआयसीसी), भारत सरकार, त्रिनिदाद आणि टोबॅगो देश, मराठी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

हेही वाचा… अमरावती: अश्‍लील व्हिडीओ बनवून महिलेच्‍या होणाऱ्या पतीला पाठवले

कार्यक्रमात त्रिनिदात आणि टोबॅगो देशातील मराठीसह इतरही भारतीय सहभागी होतील. गेल्यावर्षीपासून या पद्धतीचा कार्यक्रम येथे सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. डॉ. गिता कुऱ्हाडे करणार आहे. कार्यक्रमात प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीनेही सहभागी होणे शक्य असल्याचेही डॉ. कुऱ्हाडे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×