Premium

नागपूर भाजपतर्फे आनंदोत्सवाची तयारी; दोन ठिकाणी फोडणार फटाके

दुपारपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने दोन ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

BJP decided celebrate two places Nagpur BJP lead three of the four major states assembly elections
नागपूर भाजपतर्फे आनंदोत्सवाची तयारी; दोन ठिकाणी फोडणार फटाके (संग्रहित छायाचित्र)

नागपूर: चारपैकी तीन मोठ्या राज्यात भारतीय जनता पक्षाने मतमोजणीच्या प्राथमिक कलात आघाडी घेतल्याने नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुपारपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने दोन ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात कुठेही निवडणुका असोत, तेथे भारतीय जनता पक्ष विजयी होत असेल तर नागपूरमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो. याच परंपरेचा एक भाग म्हणून तीन मोठ्या राज्यातील निवडणुकीतील पक्षाच्या यशाचा आनंद नागपूरचे कार्यकर्ते साजरा करणार आहेत. पक्षाच्या विभागीय कार्यालयापुढे दुपारी एक वाजता आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पूर्व नागपूरमधील भाजप खासदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात दुपारी १२ वाजता आंनदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा… नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याचा संशय

नागपूरमधून भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते मध्यप्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले होते. काही जण तेथे तळ ठोकून होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मध्यप्रदेशमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. तेथे भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आनंदात आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आहे. त्यामुळे आनंदोत्सव अधिक मोठ्या स्वरुपात साजरा होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The bjp has decided to celebrate in two places in nagpur as bjp has taken the lead in three of the four major states in the assembly elections cwb 76 dvr

First published on: 03-12-2023 at 12:23 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा