रेल्वे मालगाडीचे ‘कपलिंग’ तुटले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

इंजिनसह निम्मे डब्बे पुढे अन् निम्मे थांबले जागेवरच

The 'coupling' of the railway freight train broke
रेल्वे मालगाडीचे 'कपलिंग' तुटले

अकोला : कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीचे ‘कपलिंग’ तुटल्याची घटना अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे फाटकाजवळ बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

बडनेरावरून भुसावळकडे कोळसा वाहून नेणारी मालगाडी निघाली होती. ही मालगाडी अकोला शहरातील न्यू तापडिया नगर रेल्वे फाटकाजवळ आली असताना अचानक एका डब्याचे ‘कपलिंग’ तुटले. त्यामुळे इंजिनसह निम्मे डब्बे पुढे निघून गेले. मागे ३५ डब्बे सुटले होते. तात्काळ याची माहिती लोकोपायलटला देऊन गाडी थांबवण्यात आली. या घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पुढे गेलेली गाडी पुन्हा मागे आणून दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर करण्यात आले. ‘कपलिंग’ जोडून मालगाडी अकोला रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली. दरम्यान, नागपूर-मुंबईदरम्यानची मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या घटनेमुळे रेल्वे फाटक बंद असल्याने न्यू तापडिया नगरकडे जाणारी वाहतूक देखील प्रभावित झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:38 IST
Next Story
देवलापार येथे आदिवासी नृत्यावर विदेशी महिलांनी धरला ठेका आणि नंतर…
Exit mobile version