लाखोंचा निधी खर्चून बांधण्यात आलेला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे उघडकीस आला. या प्रकरामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा – यवतमाळ : …अन् कृषिमंत्र्यांनी शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद

abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

पाणी अडवा, पाणी जिरवा, अंतर्गत शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी वरदान ठरावा व जलसिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, पाण्याचा योग्य निचरा होऊन जमिनीतील पाण्याचा स्त्रोत वाढावा, या उदात्त हेतूने मोहाडी तालुक्यातील विहीरगाव शेतशिवारातील नाल्यावर ३५ लाख रुपये खर्च करून सिंमेट काँक्रिटचा बंधारा याच वर्षी बांधण्यात आला होता. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ऐकापुरे , संबधित कंत्राटदार यांच्या नियोजनशुन्यता व बेजबाबदारपणामुळे शासनाचा लाखोचा निधी पाण्यात गेल्याने नागरिकांमधे तीव्र संताप आहे.

या प्रकारणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी डोंगरगाव जि. प. क्षेत्राचे सदस्य तथा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून केली आहे.